Ad will apear here
Next
‘एस संशोधन’तर्फे ‘सुबप’ व ‘सुबप प्लस’ सादर
पुणे : येथील एस संशोधन संस्थेतर्फे सर्व प्रकारच्या मुत्रमार्ग विकारांवर चालू असलेल्या उपचार किंवा औषधांबरोबर पूरक औषध म्हणून ‘सुबप’ व ‘सुबप प्लस’ सादर करण्यात आले पुण्यातील प्रख्यात मुत्रविकारतज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली या औषधांची निर्मिती करण्यात आली आहे.

या औषधांना अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) मान्यताप्राप्त झाली असून, ‘सुबप’ला भारतीय पेटंट, तर ‘सुबप प्लस’ला २०१६मध्ये युएस पेटंट आणि २०१७मध्ये युरोपियन पेटंट प्राप्त झाले आहे. युरोपियन पेटंटला युके, जर्मनी, फ्रान्स अशा देशांमध्ये प्रमाणन प्राप्त झाले आहे.

याबाबत बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, ‘आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने यावर संशोधन केले गेले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व नियम वापरून, तसेच चाचण्या करून आयुर्वेदिक तत्त्वांचा आधार घेऊन १० वर्षांच्या प्रयत्नांनंतर याची निर्मिती करण्यात आली आहे. शरीर प्रकृती, बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे मुत्रमार्गातील विकार भारतात वाढत आहेत. मुत्रमार्गाच्या विकारात पोटात दुखणे, मुत्रमार्गाचा दाह, जंतूसंसर्ग, रक्तस्त्राव, मुत्रविसर्जनात अडचणी निर्माण होणे ही सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात. मुत्रमार्गातील विकारामधील सध्याच्या उपचारपद्धतीमध्ये आवश्यकता असल्यास शस्त्रक्रिया, प्रतिजैविके, वेदनाशामक औषधे, मुत्राशयावर कार्य करणारी औषधे यांचा समावेश आहे. ‘सुबप’ हे अशा सर्व विकारांवर चालू असलेल्या उपचारांवर पूरक व परिणामकारक औषध म्हणून काम करते.’

‘दुसरीकडे अगदी छोट्या मुतखड्यांच्या उपचारासाठी बरेचवेळा शस्त्रक्रिया शक्य नसते. अशा वेळेस ‘सुबप प्लस’ उपयुक्त ठरते. त्याचबरोबर छोट्या व मोठ्या मुतखडयांमुळे मुत्रपिंडाच्या पेशींना झालेली इजा भरून काढण्यात मदत होते व ती परत होऊ नये यासाठी देखील परिणामकारक ठरते. अशा प्रकारचे बहुधा हे एकमेव औषध आहे. ही औषधे आजवर पाच हजारांहून अधिक मुत्रविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी घेतली असून, त्याचा फायदा त्यांना झाला आहे,’ असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

‘सुबप’ व ‘सुबप प्लस’च्या माहितीचे सादरीकरण डॉ. पाटणकर यांनी ऑल इंडिया युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया व अमेरिकन युरोलॉजी असोसिएशनच्या परिषदांमध्ये केले होते व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही औषधांचे वितरण श्रीपाद मेडिसर्चतर्फे करण्यात येत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZQXBU
Similar Posts
डॉ. सरदेशमुख, डॉ. चंदनवाले, डॉ. फडे यांना धन्वंतरी आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान पुणे : ‘रूग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी एकत्रित उपचार पद्धती हाच भविष्यकाळातील मार्ग असून, त्यासाठी सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येणे, ही काळाची व समाजाची गरज आहे,’ असे मत एस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले. आरोग्यभारती व एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language